बुधवार, ३ जुलै, २०२४

मुख्यमंत्री शिंदेंचे महिला सक्षमीकरणासाठी योगदान : अनिता जगताप

मुख्यमंत्री शिंदेंचे महिला सक्षमीकरणासाठी योगदान : अनिता जगताप

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 

राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध योजना आणून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले व खऱ्या अर्थाने महिलांचा मोठा सन्मान केला आहे. महिला भगिनींच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करणार असल्याची प्रतिक्रिया साईबाबा संस्थानच्या माजी विश्वस्त तथा शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना जगताप म्हणाल्या, महिला अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. अगदी कृषी क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रांपर्यंत महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. अशा परिस्थितीत महिलांचे सबलीकरणासाठी राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या वतीने राज्यातील महिला भगिनींसाठी विविध प्रकारच्या योजना पारीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी मोफत एसटीचा प्रवास, तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण, वय वर्ष २१ ते ६० मधील महिला वर्गासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १५०० रुपये, त्याचप्रमाणे आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून महायुतीचे सरकार महिलांना मोठा आधार देत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला भगीनींच्या उत्कर्षासाठी नवनवीन धोरण राज्य शासनाच्या माध्यमातून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांसाठी घेतलेल्या अभुतपूर्व निर्णयाबद्दल शिर्डी शहरातील महिला भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार

सामाजिक जीवनात काम करताना नगरपंचायतमध्ये नगरसेवक ते नगराध्यक्ष या कालखंडात २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करताना महिला तसेच विशेषतः मुलींचे सक्षमीकरण, सबलीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय स्वागतार्ह असून जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करणार आहे
- अनिता जगताप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...