गुरुवार, ४ जुलै, २०२४

डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथ बापू गोंदकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथ बापू गोंदकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

शिर्डी प्रतिनिधी : 

       जीवाची पर्वा न करता स्वतःचे लिव्हरचा भाग प्रत्यारोपणा साठी देऊन वडिलांना नवजन्म देणाऱ्या अभिजीतचा आदर्श आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन माजी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी केले 
               शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी डॉ सुजयदादा विखे पाटील बोलत होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक रमेश गोंदकर यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच दिगंबर शिवराम कोते होते मा खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिर्डी नगरपरिषद चे मुख्याधिकारी सतीश दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर,बाबासाहेब आप्पा कोते, राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते राष्ट्रवादीचे नेते रमेश(भाऊ) गोंदकर, ,नितीन शेळके, निलेश कोते, नितीन उत्तम कोते, विनायक कोते, आप्पासाहेब कोते,ताराचंद कोते, विजय ज्ञानेश्वर गोंदकर, विकास भाऊसाहेब कोते,उत्तम भैया कोते ,राजेंद्र देवराम कोते ,नितीन पाराजी कोते, जगन्नाथ गोंदकर, किरण मधुकर कोते, बाळासाहेब काटकर ,तुकाराम गोंदकर, संदीप सोनवणे दत्तात्रय कोते प्रसाद गोंदकर ,विकास गोंदकर , किरण कोते सुशांत आवताडे श्याम थवानी , किशोर गोंदकर गोविंद गरुड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 
याप्रसंगी विखे पाटील म्हणाले की अनेक तरुण आई-वडिलांकडे दुर्लक्ष करीत असून परिणामी वार्धक्यात अनेकांना मुले असतानाही वृद्धाश्रमाची वाढ धरावी लागते हे दुर्दैव आहे मात्र स्वतःच्या जीवापाड आपल्या आई-वडिलांना जपा त्यांच्यासाठी जीवाची पर्वा करू नका असा महत्त्वपूर्ण संदेश गोंदकर परिवारातील अभिजीत गोंदकर यांने संपूर्ण महाराष्ट्राला शिर्डी येथून दिला आहे शिर्डीतील रमेशभाऊ गोंदकर त्यांचे बंधू माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू व किशोर गोंदकर यांनी मुलांवर अतिशय चांगले संस्कार केले आहे त्यामुळेच वडील आजारी असताना अभिजीतने स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता वडिलांना लिव्हर प्रत्यारोपणासाठी स्वतःच्या लिव्हरचा भाग दिला हे उदाहरण आता अपवादाने बघायला मिळतात आजारपणातून ठीकठाक झाल्यानंतर मी स्वतःच त्यांना हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात करण्याचा आग्रह धरला होता या कार्यक्रमादरम्यान सुमारे 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले व अभिष्टचिंतन दिवशी आरोग्य सेवेसाठी मदत करायचा एक अनोखा चांगला संदेश दिला आहे शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास करायचा असून त्या दृष्टीने लवकरच शहरातील आंबेडकरनगर नाला रोड परिसरातील अतिक्रमणीत जागेत राहणाऱ्या लोकांना अर्धा गुंठा हक्काची जागा देण्याचा मानस आहे तो लवकरच पुर्तीस जाईल बावीस एकर जागेत सुमारे 40 कोटी रुपये खर्चाचा थीम पार्क उभारणार असून सुमारे 500 युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे गोंदकर परिवाराने महाराष्ट्रातील युवकांना एक नवा संदेश साईबाबांच्या पुण्यभूमीतून दिला आहे हा संदेश पोहोचवण्यासाठीच हा कार्यक्रम भव्य दिव्य होणे गरजेचे होते असे यावेळी खासदार विखे पाटील यांनी सांगितले अभिजीत गोंदकर, अमोल सुपेकर, साईश गोंदकर, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै भाऊसाहेब सखाराम पाटील गोंदकर चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी, रुद्रा फौंडेशन शिर्डी शहर त्याचप्रमाणे साईप्रसाद मार्केटचे सर्व कार्यकर्ते हॉटेल प्राइड इन चे अनंत सुराळे सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...