शनिवार, ६ जुलै, २०२४

पानेगांवात लाडकी बहिण बरोबरच शेतकरी कर्ज माफी उमटला ग्रामसभेत सुर.

पानेगांवात लाडकी बहिण बरोबरच शेतकरी कर्ज माफी उमटला ग्रामसभेत सुर.
 पानेगांव
   नेवासे तालुक्यातील पानेगाव ग्रामपंचायत च्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने विशेष ग्रामसभेचे आयोजन महादेव मंदिर सभामंडपात करण्यात आले अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच निकिता भोसले ह्या होत्या.
 यावेळी ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित केलेली असून या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय, फॉर्म भरण्यासाठी लागणारे पेपर त्याचबरोबर आदी विषयावरती माहिती ग्रामविकास अधिकारी पाखरे यांनी दिली
लाडकी बहिण योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने मुदतवाढ बरोबरच अटी शिथिल करण्यात आलेल्या असून जवळपास सर्व पेपर लाभार्थ्यांनकडेच उपलब्ध असून मोबाईल वरून घरबसल्या ॲप द्वारे नोंदणी करू शकता. 
यावेळी शेतकऱ्यांचे पिकविमा नुकसानभरपाई मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नसून शेतकरी कर्जमाफी घोषणा राज्य सरकारने करावा असा असायचा ठराव शेतकरी दिपक जंगले यांनी मांडला त्याच बरोबर गावांमध्ये गावठाण हद्दीत महावितरणच्या वतीने निष्कृष्ट झालेल्या विद्युत वाहक तारा त्यामुळे केबल टाकण्याचे काम पूर्ण झालेले असून उर्वरित रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे. पुढील पत्र व्यवहार जिल्हा ,तालुका महावितरण करण्यात यावा असायचा ठराव संदीप जंगले यांनी मांडला. 
यावेळी बाळासाहेब जंगले, कैलास गायकवाड, व्यंकट जंगले, भाऊसाहेब जंगले, अण्णासाहेब जाधव, संजय पवार, मनोज आंबेकर, दीपक जंगले, सुनिल चिंधे,रामभाऊ गायकवाड, संजय शेंडगे, किरण शेंडगे ,कचरू जाधव, ज्ञानेश्वर कटारे, अशोक जाधव ,रखमा कंक, अशोक जंगले, गंगाधर जंगले, अण्णासाहेब भालसिंग, अच्युत जंगले, बाबासाहेब शेंडगे, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
  महाराष्ट्र शासन वतीने लाडकी बहिण हि योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत वतीने गल्लोगल्ली, वाड्या वस्त्या फिरुन जास्तीत जास्त महिलांनी २१ते ६० वयोगटातील सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायत वतीने जनजागृती तसेच फॉर्म दाखल करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगून रखडलेली पिक विमा नुकसान भरपाई बाबत नेवासे तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांना भेटणार असल्याचे पानेगांव उपसरपंच दत्तात्रय घोलप यांनी सांगितले*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...