बुधवार, २२ मे, २०२४

अनुदानित आश्रमशाळा सामोडे चा बारावीचा निकाल विज्ञान शाखा १००% तर कला शाखा ९५%

अनुदानित आश्रमशाळा सामोडे चा बारावीचा निकाल विज्ञान शाखा १००% तर कला शाखा ९५%

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


माध्य व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून.अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा 95% निकाल लागला आहे.यात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत देसाई शर्मिला कांतीलाल 85.17 टक्के ,कु.तेजल संजय चव्हाण 82.17तर अहिरे वैष्णवी कृष्णा 81.17 गुण मिळवून प्रथम , द्वितीय, तृतीया आल्या तर कला शाखेत बागुल विनोद पंढरीनाथ 72.17, भोये नंदिनी जिभाऊ 70.50, सोनवणे रोशनी काळू 70.33 गुणवत्ता प्राप्त करून प्रथम द्वितीय तृतीय आलेत.
   सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनी चे म.फुले विद्या प्रसारक संस्था पिंपळनेर चे अध्यक्ष अॅड संभाजी पगारे, सचिव पुष्पलता पगारे, उपाध्यक्ष स्वप्निल पगारे, संचालक व्हि.एन.जिरेपाटील, विजयराव सोनवणे, रामदास धनवई, मिलिंद महाजन,छाया पगारे,हर्षायनी सोनवणे, इंद्रायणी वरंदळ, शाळेचे मुख्याध्यापक जगताप, प्राचार्य  झेड.एम.गवळी,व्हि.जे.एन.टी चे मुख्याध्यापक एस.बी.मोरे,रवि पगारे, टकले,योगेश वाणी, राजेंद्र साळवे,आशा पाटील, अंजना पगार, सुमित्रा गायकवाड, बच्छाव आदींनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...