गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

जीवनात पैशापेक्षा समाजसेवेत जास्त सुख मिळते रोहित काळे साहेब

जीवनात पैशापेक्षा समाजसेवेत जास्त सुख मिळते  रोहित काळे साहेब

रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेमध्ये दिनांक 4 फेब्रुवारी रोजी अमेरिका येथील ग्लोबल नगरी फाउंडेशनचे संचालक रोहित काळे साहेब यांनी गणेशनगर शाखेमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी हितगुज  करताना ग्लोबल नगरी फाउंडेशनचे उद्दिष्ट सांगितले .ग्लोबल नगरी फाउंडेशनच्या वतीने या शाळेला मागील वर्षी सायकल भेट देण्यात आले  मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून यावर्षी स्वर्गीय संजय बाळासाहेब गाढवे यांचे स्मरणार्थ दोन RO प्लांट विद्यालयाला भेट देण्यात आले .
रोहित काळे साहेब यांनी प्रत्यक्ष एक तासभर विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना अनवाणी पायाने मी शाळेत जायचो थीगळ दिलेले कपडे घातले तरीही मी माझ्या प्रगतीमध्ये परिस्थिती आड येऊ दिली नाही जिद्दीने यश मिळवण्यासाठी धडपडत राहिलो जीवनात आई-वडील आणि गुरुजनांना कधीही विसरायचे नसते त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे असा मोलाचा संदेश मुलांना दिला.

 त्यांनी आपल्या शालेय जीवनातील बालपणातील आठवणी सांगताना मुलांनो कष्टाशिवाय फळ मिळत नाही मी शालेय जीवनात फार हलकी मधून शिक्षण घेतले आहे आज मी जगातील पंधरा देश फिरून पाहिले आहेत चीनमध्ये सहा वर्षे राहिलो तेथील संस्कृती पाहिली. परंतु भारतीय संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ संस्कृती जगात कोणतीही संस्कृती नाही. म्हणून सुख हे पैशात नाही निस्वार्थीपणे केलेल्या समाजसेवेत आहे असा अनमोल संदेश जाता जाता मुलांना दिला सध्या रोहित काळे साहेब अमेरिका  या देशात एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर आहेत त्यांनी मुलांना संस्कार आणि परिश्रम यांचे महत्त्व सांगितले. बरोबर गप्पा मारता मारता मुलांना काही प्रश्न विचारले 


मुलांनी छान पैकी उत्तरे दिली उत्तर देणाऱ्यापैकी इयत्ता नववी मधील कोमल गोरे या विद्यार्थिनीला एक हजार एक रुपये बक्षीस दिले मुलांनी मनामध्ये कुठलाही न्यूनगंड बाळगू नये आत्मविश्वासाने येणाऱ्या संकटांना सामोरे जावे उच्च ध्येय मनामध्ये बाळगावे आणि परिश्रमाची जोड आपल्या कार्याला दिली तर निश्चित यश मिळते असे सांगितले 

यावेळी विद्यालयाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे संचालकश्री अनिल काका गाढवे पाटील ,श्री युवराज जाधव यांचे पिताश्री दिलीपराव हरिभाऊ जाधव , गीताताई रोहित काळे, सोनालीताई गणेश सुपेकर, श्री राजेंद्र जाधव, श्री दर्शन संजय गाढवे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर ,  विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती वराडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...