सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

राष्ट्रीय ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार राजेंद्र फंड यांना जाहीर

राष्ट्रीय ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार राजेंद्र फंड यांना जाहीर
       

  कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित २६ वे  मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर 2025 हे कोल्हापूर येथील करवीर वाचन मंदिर येथे रविवार दिनांक २८/१२/२५ रोजी संपन्न होत आहे. या संमेलनात कविसंमेलन, कथाकथन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारोह संपन्न होत आहे. या संमेलनात कला, क्रीडा, सांस्कृतिक, व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. साही. राजेंद्र फंड यांचे आजपर्यंतचे साहित्यिक कार्य पाहता या संमेलनाचे अध्यक्ष  कवी सरकार इंगळी यांनी त्यांना राष्ट्रीय ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार घोषित केला आहे. 
         दिनांक 28 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित २६ वे  मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर 2025 या संमेलनात संमेलन अध्यक्ष कवी गोविंद लहाने परभणी, उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिका (चिकोडी कर्नाटक), सौ डॉ रोहिणी दीक्षित ,प्रसिद्ध कांदबरीकर डॉ श्रीकांत पाटील , टीव्ही मालिका व अभिनेत्री .जीवीका सोनार , स्वागताध्यक्ष प्रा अमरनाथ कांबळे यांचे हस्ते देण्यात येणार आहे. 
            या पुरस्काराबद्दल  शब्दगंध साहित्यिक परिषदेचे साही. राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, शर्मिला गोसावी, प्राध्या. अशोक कानडे, वैष्णवी निर्मळ, साईनाथ रहाटकर, प्रल्हाद घोर बांड, यशवंत पुलाटे, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर, ला. डॉ. स्वाधीन गाडेकर, ला. सुनील धाडगे, ला. सागर रोकडे, महेश गाडेकर, अनिल हुपरीकर, किरण बांदेकर, विनायक फंड, सुधाकर वाघ, अनिल देसाई, सुनील निकम, साईनाथ हजारे,  व इतर अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...