सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

अहमदाबाद येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी १०२.४५० ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली.


श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. आज गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी १०२.४५० ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली. सदर सोन्याच्या मूर्तीची किंमत रु. १२ लाख ३९ हजार ४४० इतकी असून, दानशूर साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थानकडे केली आहे.

 ही सोन्याची गणेश मूर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्ताचा  सत्कार करून आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...