सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहाता मंडलातील पिंपळस गावी विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन मोठ्या उत्साहात पार पडले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहाता मंडलातील पिंपळस गावी विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन मोठ्या उत्साहात पार पडले 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष तसेच दर वर्षी प्रमाणे याही वर्षी विजया दशमी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता,
संघाचे संस्थापक प.पू.डॉ.हेडगेवार व प.पू.गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन व सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री वैभवजी लोंढे साहेब राहाता नगरपरिषद चे मुख्याधिकारी  हे होते, यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात संघाची स्थापना आणि आज पर्यंत चा संघ प्रवास याबद्दल प्रशंसा केली, संघाचे शिस्त कटिबद्धता आणि ज्येष्ठा पासून बाल स्वयंसेवकांचा उत्साह पाहून मनाला आनंद झाला आहे मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उत्तर नगर जिल्हा सहकार्यवाह योगेश कुमावत (गोपीजी) हे होते, गोपीजींनी आपल्या बौद्धिक मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्षातील कार्य आणि आजच्या स्थितीतील सुरू असलेले विविध भागातील संघ कार्यामाहिती दिली, संघाने आतापर्यंत कधीही जाहीरत केली नाही कारण संघाला साध्या पद्धतीने कार्य करणे योग्य वाटते, संघाने पंच  परिवर्तन म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर, नागरी कर्तव्य, पर्यावरण हित, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन हे 
स्वतः स्वयंसेवक आचरणात आणले आहेत आता संघ शताब्दी वर्ष निमित्ताने समाजात जाऊन जागृति करणार आहोत, संघ हा स्थापनेपासूनच म्हणजे 
सामाजिक समरसता, देशाचे हित यावर गेल्या शंभर वर्षांपासून कार्य करत आहोत आणि भविष्यातही करणार असल्याचे मनोगत केले. विजयादशमी उत्सव राहाता मंडलातील पिंपळस गावातील श्री दत्त मंदिर प्रांगणात पार पडला. याप्रसंगी खाकी पैंट, पांढरा शुभ्र शर्ट पेहराव करून शिस्त प्रिय चाकोरीबद्ध शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील व स्थानिक जेष्ठ स्वयंसेवक ,संघ प्रेमी, सज्जन शक्ती, २०० हून अधिक युवक युवती बाल स्वयंसेवक सहभागी झाले होते, उत्सव झाल्यानंतर अल्पोहराने उत्सवाची सांगता झाली यावेळी पिंपळस गावातील ज्येष्ठ व युवक स्वयंसेवकांनी कार्यक्रमचे चोख नियोजन केले होते, यावेळी राहाता उपखंड प्रमुखांनी 
बुधवार दिनांक ०८/१०/२०२५ रोजी सायंकाळी चार वाजता राहाता शहरात श्री वीरभद्र मंदिर येथून सघोष पथ संचालन पूर्ण गणवेशात राहाता उपखंडात होणार आहे, त्यावेळी आपण सर्वांनी यावे आणि संघ शताब्दी वर्षाच्या पथ संचालन चे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले आहे,
विजयादशमी उत्सव निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहाता तालुक्याचे कार्यवाह सदानंद ताम्हाणे उपस्थित राहणार आहेत. या पथसंचालनात हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...