शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

डॉ. संजय उबाळे यांचा राज्यस्तरीय गौरव

डॉ. संजय उबाळे यांचा राज्यस्तरीय गौरव



स्व. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत आयोजित राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 2025 व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी मा. पल्लवी देशमुख मॅडम (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांच्या शुभहस्ते डॉ. संजय उबाळे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजकार्य, आरोग्यविषयक जनजागृती, तसेच विविध सामाजिक उपक्रमांत त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला.
या प्रसंगी . स्वागताध्यक्ष ॲड.राजेश कातोरे, श्री.राजेंद्र फंड अध्यक्ष ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, पे. नानाभाऊ डोंगरे अध्यक्ष, पे.संदीप डोंगरे किसनराव डोंगरे बहुदेशी संस्था व मान्यवर उपस्थित होते 

डॉ. उबाळे यांनी हा सन्मान स्वीकारताना आयोजक संस्था, परीक्षक मंडळ तसेच उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, "हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ गौरव नव्हे तर समाजसेवेची नवी प्रेरणा आहे. येत्या काळातही आरोग्य, शिक्षण व सामाजिक बांधिलकी यासाठी अधिक जोमाने कार्य करीन."

या कार्यक्रमास साहित्यिक, मान्यवर, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...