बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

दहाव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आयुर्वेदाचा जनमानसात प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने लोणी येथे भव्य पदयात्रा पथनाट्याचे आयोजन

दहाव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आयुर्वेदाचा जनमानसात प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने लोणी येथे भव्य पदयात्रा पथनाट्याचे आयोजन


लोणी  

दहाव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील, अध्यक्ष, प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय लोणी यांच्यामार्फत आयुर्वेदाचा जनमानसात प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने लोणी येथे भव्य पदयात्रा व पथनाट्य यांचे आयोजन दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले होते, पदयात्रेची सुरुवात महाविद्यालयापासून करण्यात आली व त्याची सांगता पथनाट्याच्या माध्यमातून लोणी बुद्रुक ग्रामपंचायत येथे झाली. या  पदयात्रेमध्ये महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश आहेर यांनी सांगता समारंभावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच डॉक्टर निवेदिता  धनविजय यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन केले.
   

R. शिर्डी न्यूज
(प्रतिनिधी) साबळे ज्ञानेश्वर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...