मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीरामपूरकर, एकवटले

पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीरामपूरकर, एकवटले


लोणी(प्रतिनिधी)
 
 पंजाब राज्यात अलीकडेच झालेल्या भीषण पुरामुळे असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांनी आपले आश्रयस्थान, संपत्ती आणि जवळची माणसे गमावली आहेत. या संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी श्रीरामपूर शहरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी पुढे सरसावले आहेत. “चला श्रीरामपूरकर पंजाब पूरग्रस्तांसाठी, एक हाथ मदतीचा देऊया” या भावनिक घोषवाक्यासह श्रीरामपूरमध्ये मदत संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११, १२ व १३ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी – महात्मा गांधी चौक तसेच शहीद भगतसिंग चौक येथे मदत संकलन केंद्र उभारण्यात आले असून, इच्छुक नागरिकांनी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमासाठी जथेदार बाबा रणजीतसिंग जी (गुरुद्वारा श्री गुप्तसर साहिब पा.१०, मनमाड) यांचे मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक दिपक बाळासाहेब चव्हाण व नगरसेविका वैशाली दिपक चव्हाण यांच्या पुढाकारातून खालसा दल, श्रीरामपूरच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “मदतीचा प्रत्येक हात एखाद्या पूरग्रस्तासाठी जीवनदान ठरू शकतो” या जाणिवेतून शहरातील नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.
या मोहिमेत केवळ आर्थिक मदतीच नव्हे, तर जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य, कपडे व औषधे अशा स्वरूपातील मदतीचाही समावेश करण्यात येणार आहे. श्रीरामपूरमध्ये सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांचा सहभाग नेहमीच कौतुकास्पद राहिला असून, पंजाबसारख्या दूरच्या राज्यात असलेल्या बांधवांच्या मदतीसाठी श्रीरामपूरकरांनी पुढाकार घेतल्याने ऐक्याचा संदेश अधिक दृढ झाला आहे.


नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “तुमची छोटीशी मदतही एखाद्यासाठी मोठा आधार ठरू शकते. संकटग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी मदतीच्या या यज्ञात आपला सहभाग नोंदवा.” याबाबत अधिक माहितीकरिता महात्मा गांधी चौक व शहीद भगतसिंग चौक येथे उभारलेल्या केंद्राशी संपर्क साधावा, असे नगरसेवक दिपक चव्हाण यांनी सांगितले आहे.

या मोहिमेत पुढाकार घेणाऱ्यांमध्ये चंदनसिंग जुनी, रवीसिंग टाक, किरणसिंग टाक, मिथुनसिंग कलानी, अनिलसिंग टाक, सुनीलसिंग जुनी, कुंदनसिंग जुनी, युवराजसिंग कलानी, सागरसिंग कलानी, राजेंद्र चव्हाण, राजकिरण उईके, सोनू जामकर, नवनाथ पवार, विशाल पवार, गोपाल पवार, सुनील साळुंखे, सागर जाधव, किरण पठारे, अवधूत शिंदे, सुरेश खरबस, बाळासाहेब सोमवंशी, पांडू व्यवहारे, अमोल सिंग, राजकमलसिंग जुनी, राहुलसिंग कल्याणी, सोनूसिंग टाक, नायकसिंग टाक, आकाशसिंग जुनी, कुलदीपसिंग टाक, अक्षयसिंग कलानी, सचिनसिंग जुनी, हारजीतसिंग टाक, विजयसिंग जुनी, करनसिंग कलानी, सुरजितसिंग टाक, गुरमीतसिंग कलानी, जीतेसिंग टाक, विशालसिंग जुनी, हॅप्पीसिंग टाक, अभिषेकसिंग जुनी, कृष्णासिंग जुनी, गुरमुखसिंग टाक, अमृतसिंग कलानी नरसिमा सिंग टाक आबजित सिगं टाक आदींचा समावेश आहे.

या माध्यमातून श्रीरामपूरकरांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी, ऐक्य आणि मानवतेसाठी तत्परता सिद्ध केली आहे. पंजाबमधील पूरग्रस्त बांधवांसाठी उभ्या राहिलेल्या या मोहिमेला येत्या दिवसांत आणखी मोठा प्रतिसाद मिळेल, असा  विश्वास आयोजकांनी व, (पत्रकार संघटनेच्या वतीने) ज्ञानेश्वर साबळे  यांनी व्यक्त केला आहे.


R. शिर्डी न्यूज
प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...