सौ प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी व घटक पक्षाचे जन सुरक्षा कायदा विरोधात निवेदन
राहाता,
महाराष्ट्र राज्यात नागरिकांच्या मौलिक हक्कांवर घाला घालणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड परिणाम करणाऱ्या "महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा २०२४" विरोधात काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे शांततामय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी सौ प्रभावती घोगरे यांनी नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील साहेब यांच्याकडे महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने निवेदन सुपूर्त केले. निवेदनामध्ये सरकारच्या मनमानी व लोकशाही विरोधी धोरणांविरुद्ध कडक निषेध व्यक्त केला गेला.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की प्रस्तुत विधेयक मनमानी अटक व शांततामय आंदोलनांवर बंदी घालण्याचा कट रचलेला असून, भारतीय संविधानात दिलेले नागरिकांचे मुळभूत हक्क कायम ठेवण्याची कडक मागणी करण्यात आली आहे.
सौ प्रभावती घोगरे म्हणाल्या,
"लोकशाहीमुळे नागरिकांना मोकळ्या मनाने विचार मांडण्याचा व शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरकारने प्रस्तावित केलेला जन सुरक्षा कायदा या अधिकारांना गंभीरपणे आघात करणारा असून तात्काळ रद्द करावा."
तसेच श्री धनंजय गाडेकर, नाना बावके, ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, शशिकांत लोळगे,सिमोन जगताप, राजेंद्र बावके, बाळासाहेब गिधाड, गणेश सोमवंशी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात श्री भगवानराव टिळेकर, राजेंद्र बावके, विजयराव दंडवते, नानासाहेब बावके, विठ्ठलराव शेळके, अनिल बोठे, विक्रांत दंडवते, रंजीत बोठे, विजय मोगले,राजेंद्र निर्मळ, पुंडलिक बावके, लक्ष्मण सदाफळ, प्रशांत सदाफळ, सुरेश पानसरे, संपत हिंगे, कानिफनाथ तांबे, बाळासाहेब गिधाड, अमृत गायके, उत्तमराव मते, सदाशिव गाडेकर, अमोल आरणे, योगेश सातपुते, अनिस शेख, शरद घोगरे, राहुल विखे,संतोष अनाप, सोमनाथ जेजुरकर व महिला प्रतिनिधी सौ. आशाताई आहेर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील साहेब यांनी हे निवेदन स्वीकारले व प्रशासनाकडे योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
सौ प्रभावती घोगरे व इतर पक्षनेते यांनी सरकारला जनतेच्या शांततामय आवाजाचा आदर करण्याचे आव्हान केले व पुढील आंदोलनात्मक कारवायांची घोषणाही केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा