शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

लोणी खुर्दमध्ये प्रभावती घोगरे यांचा सत्कार; थोरात साहेबांची प्रशंसा

लोणी खुर्दमध्ये प्रभावती घोगरे यांचा सत्कार; थोरात साहेबांची प्रशंसा


लोणी खुर्द ता राहता



 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ.प्रभावती जनार्दन घोगरे यांचा वेताळबाबा चौक, लोणी खुर्द येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे ज्येष्ठ  श्री.आबासाहेब आहेर यांनी भूषविले.

या प्रसंगी उपस्थित राहून संबोधित करताना वक्त्यांनी काँग्रेस पक्षाचा नेहमीच जनसामान्यांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा आणि सर्व समाजघटकांना एकत्रित घेऊन पुढे जाणारा शाश्वत विचार मांडला. सौ. प्रभावती घोगरे यांच्या प्रखर वक्तृत्वातून काँग्रेसचा दमदार संदेश थेट जनमानसापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहाता तालुक्यातील राजकीय दहशतीविरुद्ध प्रभावती घोगरे यांनी उभारलेला निर्भय लढा अधोरेखित करत, त्या यापुढेही वंचित समाजाचा आवाज बनून कार्यरत राहतील, असेही सांगितले.


सत्कार स्वीकारताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे पेलणार असून, समाजहित व सामान्य जनतेच्या प्रश्नांच्या समाधानासाठी कटिबद्ध राहीन.” तसेच त्यांनी आदरणीय राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या प्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “न्यायविरोधी शक्तींशी लढण्याची क्षमता आणि जनतेशी नाळ जोडलेली कार्यशैली यामुळे प्रभावती घोगरे यांनी प्रियंका गांधी यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सत्ताधारी लोकशाही संपवण्याचे काम करीत असताना, जनतेने जागरूक राहून आवाज उठवणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमाला सरपंच जनार्दन घोगरे, सचिन गुजर, बाळासाहेब विखे, सुधीर म्हस्के, ॲड. पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, शशिकांत लोळगे, भगवानराव टिळेकर, अनिल बोठे, सचिन चौगुले, विठ्ठलराव शेळके, विवेक तांबे, उत्तमराव घोरपडे, ज्ञानेश्वर वर्पे, शीमोन जगताप, गंगाधर गमे, कानिफनाथ तांबे, बाळासाहेब गीधाड, अनिल थेटे, रंजीत बोटे, आप्पासाहेब घोगरे, दिपक विखे, भास्करराव आहेर, कैलास आहेर, बाळासाहेब आहेर, अण्णा तुपे, बाबासाहेब मापारी, उपसरपंच सौ. अर्चना आहेर, आशा आहेर, उर्मिला घोगरे, वर्षा घोगरे, सुजाता घोगरे, सुनिता कोरडे तसेच लोणी खुर्द महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन (मुन्ना) आहेर, अमोल घोगरे, शामराव घोगरे, दिपक घोगरे व सुहास आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले. लोणी खुर्द ग्रामस्थांनी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...