शनिवार, ३१ मे, २०२५

साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी नवोदित कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत पत्रकार विश्वास आरोटे .

साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी नवोदित कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत
   पत्रकार विश्वास आरोटे 


शिर्डी प्रतिनिधी 
 जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या  साईबाबा संस्थान शिर्डी मध्ये नोकरीच्या माध्यमातून सुलग ४३ वर्ष  प्रामाणिकपणे सेवा करुन  जगातून येणाऱ्या साई भक्तांची सेवा करत असताना सुरुवातीच्या काळात माफक अशा पगारावर नोकरी करून प्रामाणिकपणा जिद्द सचोटी व कष्टाळू स्वभावामुळे  सलग ४३ वर्ष काम करुन सेवानिवृत्त होत असताना अनेक अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करणारे ही कर्मचारी  साईबाबा संस्थान मध्ये काम करत असलेल्या  कामगारांचे प्रेरणास्त्रोत ठरतील असा विश्वास सेवानिवृत्त झालेल्या मारुती एकनाथ फुंदे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलताना पत्रकार विश्वास आरोटे शिर्डी येथे आपले मनोगत व्यक्त केली यावेळी राहुल फुंदे सुनीता फुंदे लक्ष्मण झाडे आदित्य झाडे राहुल घुगे दत्तात्रय घुगे आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते 



  पत्रकार विश्वास आरोटे  म्हणाले की आज  समाजात  नोकरी निमित्ताने अनेक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलत आहे एकाच ठिकाणी किंवा एका संस्थेत सलग इतके वर्ष काम करणारी मंडळी दुर्मिळ होत असताना दिसत आहे फुदे यांची जन्मभूमी जरी बीड जिल्ह्यातील आष्टी असली तरी नौकरी  निमित्ताने  शिर्डीत येऊन कर्मभूमी शिर्डी मानून साईबाबा संस्थान मध्ये नोकरी करत चांगल्या प्रकारची सेवा देऊ सलग ४३ वर्ष देऊन सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या पाठीशी मोठा असलेला अनुभव त्यांनी भविष्यात साईबाबा संस्थानच्या प्रगतीसाठी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली  सेवानिवृत्ती निमित्त साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे  साई एम्पलाॅईज सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमित  शेळके  राष्ट्रवादीचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संदीप सोनवणे. यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले  नोकरीच्या निमित्ताने सुखदुःखाच्या आठवणी सांगताना मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा कै  नंदाबाई  फुदे हिने  दिलेले पाठबळ व स्व  वडील एकनाथ  स्व आई ममताबाई यांनी दिलेली प्रामाणिकपणाची शिकवण चांगले संस्कार यामुळे आपण साईबाबा संस्थान मध्ये इतके वर्ष प्रामाणिकपणे काम करू शकलो काम करत असताना शिर्डी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्या सहकार्यामुळेच आपली शिर्डीही कर्मभूमी ठरली असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..

 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..



एक अतिशय दानशूरकर्तृत्ववानधर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्णकारांनी लिहिले गेले आहे अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केल्या. अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, नामदेवराव गिधाड,प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप, आबा मेचे ,मदनलालजी पिपाडा, रविंद्र मेचे,लिलाबाई पिपाडा,श्रृती पिपाडा,नमीता मुनोत,नेहा ताथेड,ट्विंकल पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.

        यावेळी बोलतना सौ.ममता पिपाडा म्हणाल्या की,अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. त्यांनी सैन्याची रचना मजबूत केलीअर्थव्यवस्थेला चालना दिली आणि प्रशासकीय सुधारणा केल्या. त्यांनी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. विशेषतः त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी मदत केली. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी शिक्षणआरोग्य आणि महिलांच्या हक्कांसाठी काम केले. त्यांनी महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी दवाखाने आणि आश्रमांची स्थापना केली. अहिल्याबाई होळकर या धार्मिक विचारांशी जोडलेल्या होत्या. त्यांनी अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळांची निर्मिती केली. त्यांनी तीर्थक्षेत्रांचे पुनरुत्थान केले आणि धार्मिक कार्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी अनेक धार्मिक संस्थांना मदत केली. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्य कारभारात आणि सामाजिक कार्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी एक आदर्श राज्यकर्ती म्हणून नाव कमावले आणि लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देत आहे.

        यावेळी उपस्थित सर्वांनी अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले. 

शुक्रवार, ३० मे, २०२५

डॉ संजय उबाळे यांची इंटरनॅशनल लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234D2 झोन चेअरमन पदी निवड

डॉ संजय उबाळे यांची इंटरनॅशनल लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234D2 झोन चेअरमन पदी निवड 




राहाता
लायन्स क्लब ऑफ राहता या club मध्ये अतिशय उत्तम काम केले, व क्लब ची सदस्य संख्या, अँक्टिव्हिटी, उत्तम नियोजन व सभासद यांच्या सोबत सलोख्याचे संबंध निर्माण करून राहता लायन्स क्लब चे डिस्ट्रिक्ट मध्ये नाव झाले..
क्लब मध्ये अनेक अडचणी आल्या परंतु त्यावर मात करून आपली सेवा सुरू ठेवली, डिस्ट्रिक्ट मध्ये डिस्ट्रिक्ट चेअरमन कॅन्सर, डिस्ट्रिक्ट चेअरमन डायबेटिक अशी पदे मिळाल्यानंतर पुणे,नगर,नाशिक या जिल्ह्यामध्ये जाऊन कॅम्प, अवेअरनेस शिबिरे घेतली अनेक रुग्णांना याचा फायदा व्हावा हाच उद्देश ठेवून खूप काम केले . डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी कोठावदे यांच्या कार्यकाळात यश, नेतृत्व व सेवाकार्यासाठी लीडरशिफ अवॉर्ड, अप्रेसेशन अवॉर्ड, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन हेमंत नाईक यांच्या कार्यकाळात पॅसिनेट सुपरस्टार अवॉर्ड व क्लब साठी टॉप टेन अवॉर्ड, त्यानंतर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांच्या कार्यकाळात gold अवॉर्ड, लायन सुधीरजी डागा रिजन चेअरमन यांच्याकडून दि ग्रेट लायन्स पुरस्कार, व माय प्राइड लायन, डिस्टिक गव्हर्नर विजयजी सारडा यांच्या कार्यकाळात डायबिटीस मध्ये उत्तम कार्य केल्याबद्दल कौतुक करण्यात आले 


या सर्व कामाची पावती म्हणून लायन्स क्लब चे मार्गदर्शक लायन राजेशजी मुछाल, लायन Girishbhau मालपाणी, येणाऱ्या वर्षी होणारे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल, लायन विजयजी सारडा या सर्वांनी माझ्या सारख्या सामान्य सभासद वर खूप मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल लायन्स ची सर्व टीम यांचे मनापासून आभार मानत आहे.
नगर डिस्ट्रिक्ट मधून प्रथम माझी झोन चेअरमन म्हणून निवड केली,एकूण 13 झोन चेअरमन ची निवड सध्या झाली आहे त्यात पुणे.नाशिक व राहाता अशा निवडी करण्यात आल्या आहेत
सर्व क्लब ला सोबत घेऊन सेवाकार्य करू,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व वरिष्ठ यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून झोन मध्ये उत्तम असे कार्य करण्याचा मानस आहे असे नवनिर्वाचित झोन चेअरमन डॉ संजय उबाळे यांनी म्हटले 




झोन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल दिवसभर शुभेच्छा देण्यात येत आहे त्यात प्रामुख्याने राजेशजी मुछाल past district governor, Girishbhau मालपाणी past district governor, राजेशजी अग्रवाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर,विजयजी सारडा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, श्रेयस दीक्षित vice डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, vice डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्रजी गोयल, लायन रवींद्र गोल्हार,सुधीरजी डागा, संदिपभाऊ गोंदकर, प्रकाशजी Sadaphal धनुभाऊ गाडेकर, दिलीप भाऊ गाडेकर,विजय धनवटे,चेतन भुतडा, आशिष बोरावके,कैलासबापू सदाफळ, मुन्नाभाई शाह,वसंतराव गुजर, सत्यन मुंदडा, डॉ.विजय मस्के, डॉ.भारत सुंडाळे डॉ.संजय गायकवाड,रतन चौधरी ,रवी धस ॲड.दिनेश कारले, गोरखभाऊ दंडवते,राजेंद्र बांगर,भानुदास गाडेकर, महेश वैद्य,रवी जोशी, दीपक दंडवते,अंजली उबाळे, ॲड.संतोष घोडके, सोहन  उबाळे, डॉ लीना उबाळे, डॉ मनाली उबाळे, डॉ अमोल लोणारे,विनोद गाडेकर,राजेंद्र फंड,सौरभ उगले,वराडे saheb, गोविंद आमकर  उमेश शेटे,अरुण सोनवणे, गुडू काळे,लायन्स क्लब ऑफ राहता. साईश्रद्धा नगर मधील सभासद,राज्यसघटना पदाधिकारी,सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

गुरुवार, २९ मे, २०२५

राहता तालुक्यातील कोऱ्हाळे डोऱ्हाळे वाळकी येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाचे जल पूजन प्रसंगी डॉ सुजय विखे


राहाता 

निळवंडे चे पाणी येणार नाही अशी टीका  करणा-यांना   प्रत्यक्ष पाणी पाझर तलावामध्ये आणून उत्तर दिले आहे. जोपर्यंत निळवंडे चे पाणी येत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि तो आता पूर्ण झाला आहे. या भागाचे वातावरण पाहून काही जण इकडे आले परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. येथील  जनतेने विकासला  आणि पाणी देणा-या नेतृत्वाला अर्थात मंत्री विखे पाटील यांना आठव्यांदा मतदान करून दिले आहे.  पाणी आल्याने जिरायत भाग समृध्द झाला आहे. ज्यांनी विखेना विरोध केला, त्यांना त्यांची चुक समजली आहे. त्यामुळे तेही आपल्या सोबत येत आहे. आपण जे ठरतो तेच करतो आता शेजा-यांच्या प्रेमात पडू नका असे  प्रतिपादन पद्मश्री डॉ.  विखे पाटील कारखान्याचे  अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 


 राहता तालुक्यातील कोऱ्हाळे, डोऱ्हाळे वाळकी  येथील  निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलाव्याच्या जलपूजन प्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते.  यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, निळवंडे कालव्यांची  केवळ मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणीस आणि स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव  पिचड यांच्यामुळेच पूर्ण झाले आहे. कालव्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पाणी आपल्याला उपलब्ध झाले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  १५० फुट चढ असतांना  पाणी या गावांना मिळाले. निळवंडेचे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत.

 ४० वर्ष संघर्ष केला त्याला आता यश आले आहे या पाण्याचा उपयोग शेती उत्पादन वाढवण्यासाठी करा. पाण्यावरून कायमच टीका होत गेली, पाणी आल्याने ह्या टीकेला आता पूर्णविराम मिळाला आहे.  मंत्री विखे पाटील हे शब्द पूर्ण  करणारे नेते 


 आम्ही आपल्या सोबत आहोत  असे वातावरण  या भागात होत आहे.  शिर्डी मतदार संघ  कायमच विखे पाटलांबरोबर राहिलेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असताना  भविष्यामध्ये २५ वर्षाचा विचार करून शिर्डी मतदार संघाची बांधणी  करणार असल्याचे सांगून  शिर्डी एमआयडीसी  मध्ये टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून  १६७ कोटीचा प्रकल्प, शासकिय आय.टी.आय, बायपासचे चौपदरीकरण, रोजगार निर्मीती, ऊस शेतीच्या माध्यमातून या भागाला समृद्धी देता येणार आहे. जनतेच्या विकासाठी विखे परीवार  कायमच कटीबद्ध  असल्याची ग्वाही देत,  शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आदर्श शिर्डी करीता गुन्हेगारी मुक्त शिर्डी हा आपला संकल्प आहे तो पूर्णच करणार आहोत.  

 निळवंडे पाणी प्रश्न सोडावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेलो आज जलसंपदा खाते हे काय करू शकते हे मंत्री विखे पाटील प्रत्यक्ष कामातून विरोधकांना उत्तर दिले आहे. या परिसरातील विखे पाटलांच्या अनेक विरोधकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करत आम्ही आपल्या सोबत आहोत  अशी ग्वाही या निमित्ताने दिली. गावोगावी नागरिकांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे उस्फुर्त स्वागत केले.

शिर्डी मध्ये मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी  आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने  लागोपाठ तेरा यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा  मोफत नेञ तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर .वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप.  

सोमवार दि. 2 जून 2025 रोजी सकाळी 9 ते दु.2 वाजेपर्यंत..
ठिकाण - साई 9 ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी  

ट्रस्ट चे अध्यक्ष , 
श्री अरुणराव शिंदे - गायकवाड पाटील, शिर्डी  व 
संयोजक - श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्या कडून जाहीर आवाहन करण्यात येते  की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा.

मो.क्र -  8055855445
            7030035445

रविवार, २५ मे, २०२५

तुम्ही ऊस लावा तो वाढवण्याची आणि तोडण्याची जबाबदारी सोबतच त्या ऊसाला उच्चांकी भाव देण्याची जबाबदारी आमची राहील डॉ सुजय विखे पाटील


राहाता 
चांगल्या मनाने, निस्वार्थ भावनेने काम केले तर त्याला निसर्गाची सूध्दा साथ मिळत असते. निळवंडेचे पाणी देणार हा शब्द जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. आता पाण्याची चिंता करू नका उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करा ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदत  विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून केली जाईल केली जाईल. हसून आणि आश्वासने देऊन जनतेची कामे होत नाहीत त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते असे प्रतिपादन विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
 गणेश परिसरातील खडके वाके येथील निळवंडे पाण्याने भरलेल्या पाझर तलावाचे जलपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब लावरे हे होते. यावेळी सरपंच सचिन मुरादे, दिपक गायकवाड जलसंपदा विभागाचे कैलास ठाकरे, महेश गायकवाड आदींसह विविध संस्थाचे पदाधिकारी, केलवड, आडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 यावेळी बोलतांना डाॅ.विखे पाटील म्हणाले,
 निळवंडेचे पाणी हे शेवटच्या शेतकर्याला देणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पूर्ण करणार आहोत. गणेश परिसर कायमच विखे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातले आणि केंद्रातले लोक  या ठिकाणी एकत्र  आले पण जनतेने कायमचं विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी भाषणे सोडून आणि वैयक्तिक टीका सोडून काहीच केले नाही.श्री गणेश कारखान्याच्या  माध्यमातून राजकारण करू नका. अजून बराच हिशोब मला पूर्ण करायचा आहे असे सांगत गणेश कारखाना सुरू करण्यासाठी जवळ पास शंभर कोटी खर्च केले तो कारखाना व्यवस्थित चालवा त्याचा वापर हा राजकारणासाठी करू नका सल्ला डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिला.
मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाचे काम  लोकाभिमुख ठरत आहे. शिर्डी मतदार संघ हा भयमुक्त आणि गुन्हेगार मुक्त करणे हाच आपला ध्यास आहे. मंत्री विखे पाटील यांनी जिरायत भागासाठी सुरू केलेल्या साईगंगा  योजनेचे नूतनीकरण करून ही योजना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून  पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची ग्वाही दिली


 शिर्डी मतदारसंघात पुढील ५० वर्षाचा विचार करून शेती, दूध, पाणी, आणि रोजगारासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जनतेच्या विश्वासाला विखे पाटील परिवार हा तडा जाऊ देणार नाही. आपले भविष्य उज्वल करण्याचे काम आपण करत आहोत. भाषणे करून गेले त्यांना जनतेने निवांत केले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजोबांनी पाझर तलाव बांधले, वडिलांनी त्यात पाणी आणले, आणि मी त्याचे पूजन करतो यासाठी मोठं भाग्य लागते आणि हे सर्व केवळ जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच शक्य झाले आहे. आज शिर्डी मतदार संघामध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून काम उभे राहत आहे दूध उत्पादन दूध उत्पादकांसाठी पशुखाद्य प्रकल्प,  कचरा मुक्त गाव योजना  राबवण्यासाठी गोगलगांव या ठिकाणी सेंद्रिय खत उत्पादन प्रकल्प राबवला जाणार आहे.


 विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून   प्रवरेच्या आणि विळद घाट येथील कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर  याठिकाणीहून  दर्जेदार ऊस रोपे देऊन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे हे प्रोत्साहन देताना एकरी उसाची उत्पादकता वाढीसाठी विशेष प्रयत्न हे या भागामध्ये केले जाणार आहे. तुम्ही ऊस लावा  तो वाढवण्याची आणि तोडण्याची जबाबदारी सोबतच त्या ऊसाला उच्चांकी भाव देण्याची जबाबदारी ही आमची राहील असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. 
 प्रारंभी सरपंच  सचिन मुरादे यांनी खडकेवाके गांवच्या विकासामध्ये  विखे पाटील कुटुंबाचे योगदान  आहे. पाणी आल्याने आणि कात नदीवरील बंधा-यासाठी भरीव निधी दिल्याने आज शेतीचाही प्रश्न सुटला आहे. जालिंदर मुरादे यांनी आभार मानले. 


  
राजकारण हे व्यक्ती केंद्रित करू नका.  गणेश कारखाना जरूर चालवा परंतु त्याचा वापर राजकारणासाठी करू नका. गणेशच्या कर्मचाऱ्यांना भरभरून दिले पण त्यांनी  विरोधात काम केले अशी खंत व्यक्त करतानाच मी दिलखुलास माणूस आहे मी गोड बोलत नाही परंतु जे बोलतो तेच करतो.आज अनेकांची दुकाने बंद झाल्याने विरोधक हे आपल्याकडे येतात पण या विरोधकांना कार्यकर्त्यांनी चांगले पारखून घ्या त्यांचा त्रास आपल्याला होता कामा नये ही जाणीवही ठेवा असाही सल्ला कार्यकर्त्यांना  देत  मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऊस उत्पादकांसाठी उस लागवडीसाठी विशेष घोषणा करणार असल्याचेही सुवाच्च त्यांनी केले.

शनिवार, २४ मे, २०२५

कॅबिनेट मंत्री ना , श्री छगन भुजबळ यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले

महाराष्‍ट्र राज्‍याचे कॅबीनेट मंत्री मा.ना.श्री छगन भुजबळ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात,जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

शुक्रवार, २३ मे, २०२५

पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या शिर्डीतील मुस्लिम बांधवांना मान्यवरांकडून शुभेच्छा

पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या शिर्डीतील मुस्लिम बांधवांना मान्यवरांकडून शुभेच्छा

शिर्डी 

शिर्डी पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या शिर्डीतील मुस्लिम बांधवांना मान्यवराकडून शुभेच्छा देण्यात आल्या व सत्कार करण्यात आला यावेळी हाजी अब्दुल बाबाचे पण तू गप्पार खान पठाण म्हणाले की श्री साईबाबांच्या कृपेने शिर्डीतील चार बांधवांना यावर्षी ही संधी प्राप्त झाली याचा मनस्वी आनंद व शिर्डीकरांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल आभार हज यात्रेकरता जाणारे चार मान्यवर हाजी गफारखान पठाण हाजी युसुफ शेख हाजी बाबुभाई शेख हाजी निसार पठाण यांना हज यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व सत्कार करण्यात आला यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते डॉ नचिकेत वरपे सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव होळकर आसारामजी वारे युवा नेते नानासाहेब शिंदे बंडू गागरे विजय पवार धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुलतान भाई पठाण आयोद्दीन शेख इब्बाल भाई पठाण साजिद शेख वसीम पठाण नदीम पठाण व शिर्डी शहरातील ग्रामस्थ व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवी राजेंद्र फंड यांची निवड :

राहाता
            लोककला कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवी, साहित्यिक राजेंद्र फंड यांच्या निवडीची घोषणा या संमेलनाचे संयोजक साहित्यिक  श्री. बाबासाहेब पवार यांनी नुकतीच केली आहे. दिनांक 1 जून 2025 रोजी  वडाळा महादेव येथील त्रिंबकेश्वर सभागृहात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद  जेष्ठ साहित्यिक  बाबुराव उपाध्ये हे भूषविणार असून उद्घाटक म्हणून उक्कलगाव येथील ह भ.प. बाबा महाराज ससाणे हे भूषविणार आहेत.याचबरोबर प्रमुख मान्यवरांमध्ये वासुदेव काळे, सिद्धिविनायक चेअरमन ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्कर , कामगार नेते अविनाश आपटे, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, काटे स्वामी पतसंस्थेचे चेअरमन अनिरुद्ध महाले, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ महाले, पत्रकार प्रकाश कुलथे, पत्रकार विकास अंञे ,करण नवले ,सरपंच चंद्रकलाताई पवार ,चेअरमन धनंजय पवार, संचालक रामभाऊ कसार, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
                  एकदिवसीय या साहित्य संमेलनात उद्घाटन सत्राबरोबरच परिसंवाद, भारुड,  शाहिरी जलसा, चित्रप्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, गवळणी, दोन सत्रात कविसंमेलन इत्यादी कार्यक्रम पार पडणार आहेत. 
                    साहित्यिक , कवी राजेंद्र फंड हे " आरोग्य विभागात तालुका आरोग्य  सहाय्यक पदावर  नोकरी करत असून ग्रामसेवा संदेश " या दिवाळी अंकाचे ते सहसंपादक आहेत.  गेल्या पंधरा वर्षापासून ते दिवाळी अंक काढून मोफत साहित्यिकांना व साहित्य रसिकांना देतात. याचबरोबर शब्दगंध साहित्यिक परिषदेचे, कार्याध्यक्ष, सहसचिव हे पदे आतापर्यंत भूषविले असून  आता ते प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचे ते स्पर्धा प्रमुख म्हणून ही आहेत. कविसंमेलनाचे आयोजन करणे तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविणे असे कार्यक्रम ते वारंवार घेतात. त्यांचे तीन गीतसंग्रह तर " देडगांवचा बालाजी " हे धार्मिक पुस्तक प्रकाशित असून याच धार्मिक पुस्तकावर  दूरदर्शनने टेलिफिल्म ही बनविली आहे.  विश्वस्तरीय लेखनस्पर्धेत  कवितेचे रसग्रहण या  लेखनप्रकारात त्यांना अनेक वेळ प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहेत. साहित्याबरोबरच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान उपक्रमासाठी कलापथक तयार करून हागणदारी मुक्तीसाठी गावे, शाळा, महाविद्यालय, साहित्य संमेलनात कलापथकाचे कार्यक्रम करून हागणदारी मुक्ती, तंटामुक्ती ,  आरोग्य जनजागृती केली आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून डायबेटिक उपक्रमाचे ॲम्बेसेडर म्हणून कार्य करतांना वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावर टॉपटेनमध्ये राहिले आहे. त्याचबरोबर लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे ते चार्टर प्रेसिडेंट आहेत. राहाता शहर स्वच्छता अभियान व वृक्षारोपण  मोहिमेत त्यांचा सहभाग आहे. सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून दर महिन्याला गड किल्ले चढाई मोहीम, गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम, बीजारोपण करण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असतो. आजपर्यंत त्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय  अनेक पुरस्काराने त्यांना व त्यांच्या साहित्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


              संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संपादक श्री. राजेंद्र देसाई, संपादक श्री.  महादेव दळे, संपादक श्री. बाळासाहेब  जाधव,  संपादक श्री. राजेंद्र नारायणे,  ढाकणे एज्युकेशन संस्थेचे श्री. एकनाथराव ढाकणे,  ला. गिरीश मालपाणी, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे  संस्थापक ला. विनोद गाडेकर व सर्व टीम, ला. संजय उबाळे, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, संस्थापक  सुनील गोसावी, शर्मिला गोसावी, प्राध्या. अशोक कानडे, सुभाष सोनवणे, ऐश्वर्याताई सातभाई, प्राध्या. संजय दवंगे, हेमचंद्र भवर, अनिल देसाई, सुधाकर वाघ, सुनील निकम, विलास रोकडे, सागर रोकडे यांनी अभिनंदन केले आहे.

गुरुवार, २२ मे, २०२५

खडकेवाके येथे डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही

खडकेवाके येथे डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही


लोणी
 खडकेवाके ता.राहाता येथील फूड टेक्नॉलॉजी कॉलेज येथे डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा जनता दरबार उत्साहात संपन्न झाला. या जनता दरबारासाठी अहिल्यानगर व परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपापल्या समस्या मांडत त्यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली.

दरबाराच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फुलांचा हार, शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.


यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची योग्य ती दखल घेतली जाईल, तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही देखील दिली.


सदरील जनता दरबारात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांवर भर देण्यात आला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासनाशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली भूमिका सकारात्मक राहील, असेही आश्वासन या दरम्यान उपस्थितांना दिले. या जनता दरबारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लक्ष्मीबाई आग्रे यांचे निधन

राहता तालुक्यातील एकरुखे येथील वारकरी सांप्रदायातील श्रीमती लक्ष्मीबाई मुरलीधर आग्रे वय 96 यांचे निधन झाले यांना चार मुले, तीन मुली ,सुना, नातवंडे ,पतवंडे असा परिवारआहे बबनराव ,अण्णासाहेब ,रमेश, ज्ञानेश्वर आग्रे यांच्या त्या मातोश्री होत

शनिवार, १७ मे, २०२५

शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्यात आदर्श कसा राहील यासाठी सदैव प्रयत्नशील - डॉ.सुजय विखे पाटील





 निळवंड्यांचे पाणी देणार हा विश्वास जनतेला दिला होता आज निळवंडे चे पाणी आपल्याला मिळाल्याने हा विश्वास सार्थकी ठरला. आपण ठेवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय आहे. पाण्यासाठी कुणी आडवे येवू नये. गुन्हेगारी मुक्त शिर्डी मतदार संघासाठी आजही आपली भूमिका आपण बदललेली नाही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही उलट शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्यात आदर्श कसा आदर्श कसा राहील यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
निर्मळ पिंपरी, अस्तगांव, केलवड, आडगांव बुद्रुक येथील पाझर तलाव तलावाचे जलपूजन प्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंता लव्हाटे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी महिला उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. विखे पाटील म्हणाले,,निळवंडे चे पाणी येईल की नाही ही प्रत्येकाच्या मनात शंका होती परंतु आज ती शंका दूर झाली आहे. प्रत्येकाला पाणी मिळत आहे आणि यापुढेही ते मिळत राहणार आहे. आज मी बोललो की मोठी टीका टिपणी होती परंतु शिर्डी आज भयमुक्त होत आहे. त्याचबरोबर मतदार संघामध्ये वेगवेगळ्या कामातून विकास हा सुरू आहे विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे निळवंडे हे स्वप्न होते आज त्याची पूर्तता झाली आहे ते जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असतांना जिरायत भागांमध्ये पाझर तलावाची निर्मिती त्यांनी केली आज ते पाझर
 तलाव उन्हाळ्यामध्ये भरले हा आनंद आपल्यासाठी मोठा आहे.
जनतेच्या हितासाठी वाईटपणा घ्यावा लागला तरी तो वाईटपणा घेण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि मतदार संघ हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आपण होऊ देणार नाही. या मतदारसंघा मध्ये अनेकांनी विष कालवण्याचे काम केलं परंतु त्यांना जनतेने धडा शिकवला आहे काम करणाऱ्याच्या मागे जनता ही कायम असते हेच शिर्डी मतदार संघामध्ये जनतेने दाखवून दिले आहे. गोरगरीब जनतेसाठी सदैव कार्यरत राहून जनतेसाठी आपल्यापुढे पैशाचे मोल काहीच नाही आज जिरायत भागाची ओळख बागायत भाग म्हणून होत आहे. आता प्रत्येकाला पाणी मिळणार आहे उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करून ऊस उपलब्ध करा विखे पाटील कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली आहे. आपण ऊस बेणे देऊ तुम्ही फक्त ऊस लागवड करा त्याची जोपासना आणि
ऊस तोडून नेण्याची जबाबदारी आपली राहील. संकटामध्ये तुम्ही उभे राहिलात मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहील असेही डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.


प्रत्येक आवर्तनातून आपण पाणी देण्यासाठी अभ्यास करत आहोत प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे या पुढील काळात पाणी द्या असे अर्ज तुम्ही करण्याऐवजी पाणी बंद करा असे अर्ज आपल्याकडून येतील असे सांगतानाच ज्यांनी पाणी दिले त्यांनाच ऊस द्या असे आवाहन डॉ. विखे यांनी केले

शुक्रवार, १६ मे, २०२५

मंत्री अतुल सावे यांनी घेतले साईबाबा चे दर्शन

मा.ना.श्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्‍याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक उर्जा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

उष्णतेच्या तीव्रतेमुळे साई भक्तांना उष्णते पासून होणारे त्रास कमी करावा निलेश शिंदे पाटील

उष्णतेच्या तीव्रतेमुळे  साई भक्तांना उष्णते पासून होणारे त्रास कमी करावा निलेश शिंदे पाटील 



 तापमान ४२ ते ४७ अंश सेल्सिअस इतके वाढले आहे. या प्रचंड उष्णतेमुळे श्री साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, तसेच जेष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या सोयीसाठी व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना तातडीने राबविण्याची विनंती करत आहे:
. मंदिर परिसरात फॉगर (Foggers) व स्प्रिंकलर्स लावण्यात यावेत, जेणेकरून परिसरात थंडावा निर्माण होईल.

दार्शनिक रांगेत व भाविकांच्या चालण्याच्या मार्गावर ओलसर ठेवता येतील अशा प्रकारचे मॅट्स (Floor Mats) अंथरावेत, ज्यामुळे उष्णता कमी होईल व चालताना त्रास जाणवणार नाही.
 मंदिर कॉरिडॉर व मंडप परिसरात मोठ्या क्षमतेचे कूलर्स व फॅन्स लावावेत, जेणेकरून भाविकांना तातडीने थंडावा मिळेल.
 मंदिर परिसरात व संस्थानाच्या विविध विकाणी मोफत थंडगार पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात यावी.
. १६ गुंठे क्षेत्रामध्ये दोन बाजूंनी बसण्याची सोय असलेली चेअर स्टँड्स उभारण्यात यावीत, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांसाठी.

वरील उपाययोजना तातडीने अमलात आणल्यास, शिर्डी येथील भक्तांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा-सुविधा देता येतील आणि श्री साईबाबा संस्थानचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला जाईल. आपण सकारात्मक विचार कराल व त्वरित निर्णय घ्याल अशी आशा आहे. यावेळी निलेश शिंदे पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस दीपक भाऊ गोंदकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमित दादा शेळके अजित जगताप  , अमोल गिरमे , गंगाधर वाघ आधी कार्यकर्ते पद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनाही निवेदन देण्यात आले वाढता उन्हापासून साईभक्त असे संरक्षण व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस  युवक चे अध्यक्ष निलेश भाऊ शिंदे पाटील यांनी साई भक्तांसाठी स्प्रिंकलरची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकर साई भक्तांचा उष्णतेपासून बचाव होईल अशा उपायोजना केल्या जातील

श्री साई चरणी चांदीचा हार अर्पण

श्री  साई चरणी चांदीचा हार अर्पण 



  शिङी  ..
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक १५ मे २०२५ रोजी गोपी फिल्‍मस प्रा.लि. मुंबई यांनी श्री साईचरणी ४०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला चांदीचा  हार अर्पण केला. यासह मेडीकल फंडासाठी रुपये ०१ लाख ११ हजार १११ देणगी दिली. हा सुंदर नक्षिकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार केला.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...