फक्त जैन धर्मच नव्हे तर भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरीता आहे. अशी भावना भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी भगवान महावीर जयंतीच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केली.
राहाता शहरात मोठया उत्साहात जैन धर्माचे 24 तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी राहाता शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सकल जैन समाज या शोभायात्रेत सहभागी झाला होता. अतिषय शांततेच्या मार्गाने भगवान महावीरांचा जयघोष करत मिरवणुक राहाता शहराच्या मुख्य चौकात आली. यावेळी त्याठिकाणी भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा,प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा,संघपती अनिल पिपाडा,मुख्याधिकारी लोंढे साहेब,जेष्ठ पत्रकार रामकृष्णजी लोढें,आरपीआयचे दिलीपराव वाघमारे,शिवाजी आनप प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या वर्षा दीदी,बजरंग दलाचे शुभम मुर्तडक,योगेश मखाना,श्रीगणेश स्कुलचे दत्तात्रय शेटे सर,बौद्ध धर्माचे महामोगलायन भंतेजी,सुत्रसंचालक म्हणुन नरेंद्र मुनावत,नेमिचंद लोढा, जैन युवक मंडळाचे योगेश मुनावत,अभिजित पिपाडा,रौनक धाडीवाल,सार्थक भनसाळी,निखील पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ.पिपाडा बोलताना पुढे बोलताना म्हणाले की, जैन धर्माचे 24 तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या चरणी कोटी-कोटी वंदन व नमन करतो. उपस्थित सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो. अहिंसा परमो धर्माह..या उक्ती प्रमाणे जैन धर्म हा अहिंसेच्या मार्गावर चालणार धर्म आहे. हा उपदेश केवळ जैन धर्मच नव्हे तर संपूर्ण मानवजाती साठी आहे. आपल्या वाणीतुन एखाद्याचे मन दुखणे हे सुद्धा एक हिंसाच आहे. त्यांमुळे भगवान महावीरांच्या उपदेशांचे जास्तीत जास्त पालन करुन आपले जीवनमान आनंदमय कसे करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सर्वच क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे. आपण स्वत: पुरते सीमित न राहता जन कल्याणासाठी काय योगदान देता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. हे दायित्व प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे. आपल्या हातुन इतरांना मदत झाली पाहिजे. जगा व जगु द्या ,प्राणी मात्रांवर दया करा...या उपदेशाचे महत्व समजुन घ्या व इतरांनाही सांगा व अनुकरण करा.असे आवाहन मी उपस्थीत सर्वांना करतो अशी भावना डॉ.पिपाडा यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्वांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रामाचे आयोजन जैन श्रावक संघाच्या प्रेरणेने जैन युवक मंडळाने केले. या भव्यदिव्य अशा मिरवणुकीला श्रीगणेश स्कुलचे लेझीम पथक तसेच प्रिती सुधाजी स्कुलचे ढोल पथकाने वेगळीच रंगत आणली होती. जैन पाठशाला चालविणा-या सुनिता बागरेचा यांनी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सांगता साकुरी येथील सिद्ध संकल्प मंगल कार्यालय येथे करण्यात आली याठीकणी आनंद जैन पाठशाला,सुशिल बहु मंडळ,आदर्श बहु मंडळ यांनी विविध नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा