मानसिक तणाव हेच आजाराचे मुख्य कारण... पी एस आय कोमल कुमावत

सालाबाद प्रमाणे राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे रविवारी पहाटे ७ वाजता अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.राहाता नगरपालिकेच्या प्रांगणात पार पडलेल्या हा उत्सवात राहाता पोलिस स्टेशनच्या पी एस आय कोमल कुमावत व लोणी येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर परमेश्वरी भडकवाड ह्या प्रमुख अतिथी होत्या.सुरवातीला सर्व महिलांना फेटे बांधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पर्स देऊन सन्मानित करण्यात आले.

साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्तावना करत सूत्रसंचालन केले.साईयोग फाउंडेशनच्या सुष्मिता चव्हाण यांनी फाउंडेशन द्वारे महिलांचा सन्मान केला जातो हे योग साधना किंवा सहलीच्या वेळी आम्ही अनुभवतो असे नमूद करत योगसाधनेसाठी सर्व महिलांनी नियमित येऊन आपले आरोग्य सांभाळण्याचे आवाहन केले.कृषी अधिकारी निर्मला पोटे यांनी स्रीचा सन्मान जीवनभर व्हावा असे म्हणत घरच्यांचे पाठबळ असेल तर स्री कितीही मोठ्या संघर्षाला तोंड देऊ शकते.स्त्रीरोग तज्ञ डॉ परमेश्वरी भडकवाड यांनी स्त्रियांच्या प्रमुख आजारांचे लक्षणे सांगून उपचारांचे सोप्या भाषेत विवेचन केले. पी एस आय कोमल कुमावत म्हणाल्या स्त्रियांच्या आजाराचे कारण हे मानसिक तणाव आहे.स्त्री ही पूर्वापार अत्याचार सहन करीत आली आहे.प्रत्येक स्त्रीकडे मोबाईल आला आहे.सायबर गुन्ह्याबद्दल सविस्तर माहिती देत त्यातून आपला बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन केले.घड्याळाच्या काट्याप्रमाणे स्त्री ही सर्वांसाठी राबत असते व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते.तिने स्वतःसाठी एक तास काढून व्यायाम अथवा छंद जोपासला पाहिजे.म्हणजे मानसिक ताण कमी होऊन ती आनंदी होईल.शेवटी आपल्या सुरक्षिततेसाठी आम्ही पोलिस चोवीस तास तत्पर आहोत असे आश्वाशीत करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी खटकळी परिसर येथे दहा फुटी वट वृक्षाचे सर्व महिलांच्या हस्ते रोपण करण्यात आले.
याप्रसंगी दहेगाव च्या सरपंच पूनम डांगे,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ अंजली पानगव्हाणे,पोलिस कॉन्स्टेबल दिपाली गलांडे,आशा पिपाडा,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,सुवर्णा गाडेकर,अर्चना गाडेकर,सुरेखा दंडवते,रुपाली दवंगे,कांचन बाबर,मंगल फटांगरे,सीमा वाघमारे,रेणुका कासार,शोभा वाळेकर,पुनम लुटे,सीमाताई आरणे,लताताई सदाफळ,ताई निर्मळ,कामिनी सातव,पुष्पाताई गायकवाड,ताराबाई नावकर, रूपाली पिपाडा,राजेश्वरी बावके तसेच पत्रकार राजूभाई पठाण,साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, डॉ अविनाश भडकवाड,रवी बोठे,मोहन तांबे,संजय बाबर,विलास वाळेकर,संदीप डांगे,गोरखनाथ दंडवते,मनोज पिपाडा,परमेश चव्हाण,भरत दवंगे,बबलू फटांगरे,प्रकाश पुंड,व्यंकटेश अहिरे,संजय वाघमारे,अनिल सातव,विठ्ठल निर्मळ,पांडुरंग गायकवाड,विष्णू गाडेकर,प्रवीण खंडीझोड,सिताराम बावके,कैलाश चेनुके,शिवाजी पोटे,उमेश लुटे,रंगनाथ सदाफळ, दीपक गाडेकर,बाळासाहेब तारगे,अंकुश गांधी,गणेश कासार,संतोष बावके,ज्ञानेश्वर आरणे,अर्जुन चव्हाण,सार्थक तुपे,प्रणव लावर,प्रभाकर नावकर,संजय गोयर,योगेश वैराळ,प्रसाद लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा