निळवंडे धरणातून डाव्या कालव्यास ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे-उपसरपंच साहेबराव आदमाने
निळवंडे धरणातून शेतीसाठी ओव्हर फ्लोचे पाणी डाव्या कालव्यास सोडावे ,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सध्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदी पात्रात चालू आहे. तरी ते पाणी कालव्याद्वारे जिरायती भागाला द्यावे, अशी मागणी धनगरवाडी ,वाकडी, लांडेवाडी, खंडाळा या गावांकडून होत आहे. कालव्याची उन्हाळ्यात चाचणी झाला आहे. पन्नास वर्षापासून लोक पाण्याची आतुरतेने वाट बघत आहे, आता कालवा होऊनही पाणी सोडले जात नाही. जिरायती भागामध्ये विहिरी सध्या कोरड्या ठाक आहेत, जनावरांना चारा नाही .तरी पाणी त्वरीत सोडावे,अशी मागणी करण्यात आली. धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने, शेतकरी संघटनेचे रूपेंद्र काले, मछिंद्र येलम, धनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ खरात, तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल परसराम रक्टे, गामपंचायत सदस्य राजू रक्टे, गणेश राशिनकर, अशोक रक्टे, रंगनाथ राशिनकर, अमोल साखरे, विलास मंडलिक, संजय राशिनकर इत्यादींच्या सहया आहे. तसेच अनिल रक्टे, राजू रक्टे, अशोक रक्टे, रामभाऊ रक्टे, संभाजी आदमाने, विलास रक्टे, अण्णा आदमाने, दादा रक्टे, अंबादास रक्टे, लक्ष्मण राहिंज, शिवाजी आदमाने, गिताराम आदमाने, केरु रक्टे आदी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा