राहाता=
राहाता येथील साईयोग फाउंडेशन गेली दहा वर्षांपासून जागतिक योग दिनानिमित्त मोफत योगप्राणायाम शिबिर आयोजित करत आलेले आहे.या वर्षीही बुधवार दि.१९ जुलै ते शुक्रवार दि.२१ जुलै दरम्यान सावता महाराज मंदिर राहाता येथे मोफत योग शिबिर आयोजित केलेले आहे.योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्र शुद्ध व सोप्या पद्धतीने योगप्राणायाम शिकविले जाणार आहेत.
संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साईयोग फाउंडेशन द्वारे गेली १८ वर्षांपासून रोज पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत सुरू केलेले मोफत योग वर्ग आजमितीस चालू आहे.या बरोबरच गेली सात वर्षांपासून दर रविवारी सकाळी एक तास सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान अथवा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम राबवित आले आहे.याद्वारे आज राहाता व परिसरात सुमारे चार हजार झाडी जगविली आहेत.यामुळे राहाता शहराच्या सौंदर्यात भरच पडत आहे.तसेच तीन वर्षापूर्वी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी पहाटे सायकल चालवा अभियान द्वारे राहाता शिर्डी साई सायकल परिक्रमा सुरू केली आहे.विविध सामाजिक उपक्रमांद्वारे निसर्ग संवर्धनाचा वसा घेतला आहे.याकामी राहाता नगरपालिका,ग्रामस्थ व इतर सामाजिक संस्थांचे अनमोल सहकार्य मिळत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर निरोगी व मन प्रसन्न ठेवण्यासाठी योग प्राणायाम शिवाय पर्याय नाही.त्यासाठी या मोफत योग शिबिरात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होवून निरोगी जीवनाची वाटचाल करावी असे आवाहन डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा