रविवार, ३० जून, २०२४

शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडीने जाणाऱ्या वारकरी भाविकांची पिण्याची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी स्वर्गीय भाऊसाहेब गोंदकर चारिटेबल ट्रस्टच्या वतीने शिर्डी येथील विठ्ठल मंदिरास नवीन पाण्याची टँकर देणगी

शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडीने जाणाऱ्या वारकरी भाविकांची पिण्याची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी स्वर्गीय भाऊसाहेब गोंदकर चारिटेबल ट्रस्टच्या वतीने शिर्डी येथील विठ्ठल मंदिरास नवीन पाण्याची टँकर देणगी

शिर्डी प्रतिनिधी : 

       शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडीने जाणाऱ्या वारकरी भाविकांची पिण्याचे पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी
स्वर्गीय भाऊसाहेब सखाराम पाटील गोंदकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिर्डी येथील विठ्ठल मंदिरास नवीन पाण्याचा टँकर देणगी म्हणून कायमस्वरूपी भेट देण्यात आला आहे शनिवारी शिर्डी ते पंढरपूर प्रस्थान झालेल्या पायी दिंडी पालखी सोहळ्या सोबत हा टँकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल झाला आहे
       शिर्डी येथील वैकुंठवासी ह, भ,प, लक्ष्मण महाराज वाकचौरे यांच्या प्रेरणेने तसेच वैकुंठवासी, ह,भ,प, भास्करराव सखाराम गोंदकर पाटील महाराज यांच्या सहकार्याने शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडी जात असते यंदाचे हे 59 वे वर्षे असून शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता या दिंडी पालखी सोहळ्याचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले दरवर्षी पिण्याचे तसेच वापराच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेता स्वर्गीय भाऊसाहेब सखाराम पाटील गोंदकर, चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डीच्या माध्यमातून श्रीमती इंदुबाई भाऊसाहेब गोंदकर तसेच शिर्डी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ (बापू) गोंदकर यांनी दिंडी करिता शिर्डीचे श्री विठ्ठल मंदिरास नवीन पाण्याचा टँकर कायमस्वरूपी भेट देण्यात आला, या टँकर श्री विठ्ठल मंदिराकडे सपूर्त करणे प्रसंगी गोंदकर यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश {भाऊ} गोंदकर शिर्डी वि,का,सेवा, सोसायटीचे माजी चेअरमन किशोर गोंदकर शिर्डी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक गोंदकर ॲड योगेश्वर गोंदकर, साईप्रसाद गोंदकर, अभिजीत गोंदकर, साईश गोंदकर, गोंदकर परिवारातील सर्व सदस्य तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुनिल भास्करराव गोंदकर उपाध्यक्ष ह.भ.प. सुर्यभान भगवंता कोते सचिव ह.भ.प. यशवंत राधाकृष्ण वाघचौरे खजिनदार ह.भ.प. दत्तात्रय जगन्नाथ लुटे तसेच सन्माननीय विश्वस्त ह.भ.प. आण्णासाहेब सुर्यभान गोंदकर ह.भ.प. भाऊसाहेब मुरलीधर गोंदकर श्री रमेश शिवाजी कोते श्रीमती सुमनबाई भास्करराव गोंदकर .सौ.आशालता तुकाराम तांबे, श्रीआशिष अनिल गोंदकर, ह.भ.प.रामा दुर्गा शेवाळे, आदी मान्यवर व भजनी मंडळ गणपत अण्णा गोंदकर मोठ्या प्रमाणात पालखी बरोबर जाणारे वारकरी उपस्थित होते तदनंतर
शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडीचे सकाळी नऊ वाजता पंढरपूर कडे प्रस्थान झाले याप्रसंगी टाळकरी विणेकरी महिला भगिनी तसेच महिलांच्या डोक्यावरती तुलसी वृंदावन विठ्ठल नामाच्या जय घोष करीत जय जय राम कृष्ण हरी नामाचा गजर करीत पालखीचे प्रस्थान झाले याप्रसंगी मोठ्या संख्येने वारकरी बांधव तसेच साईभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


चौकट

       शिर्डी येथील ह,भ,प, लक्ष्मण महाराज वाकचौरे यांच्या प्रेरणेने वारकरी संप्रदायात मोठ्या भक्ती भावाने सेवा देणाऱ्या स्वर्गीय भाऊसाहेब सखाराम पाटील गोंदकर परिवाराला वारकरी व आध्यात्मिक सेवेचा मोठा वारसा लाभलेला आहे शिर्डीत येणारा भाविक असो अथवा दिंडीने वारीला जाणारा भाविक यांच्या सेवेला धावून जाणारा हा परिवार आहे आपल्या वडिलांचा व आईचा अध्यात्मिक सेवेचा व संस्काराचा वारसा निरपेक्ष व निस्वार्थ भावनेतून माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ गोंदकर व सोसायटीचे माजी चेअरमन किशोर गोंदकर यांनी अविरत पणे चालवला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टला कायमस्वरूपी टँकर देऊन वारीला जाणाऱ्या तसेच शिर्डीला येणाऱ्या भाविकांची पाण्याची गैरसोय दूर केली हा खरा परमार्थ होय

श्री दत्तात्रय जगन्नाथ लुटे

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट शिर्डी विश्वस्त मंडळ

शिर्डीत साईभक्त भाविकांना चांदीचा ताटात जेवण साईभक्त तथा उद्योजक दीपकजी निकम यांचा उपक्रम


शिर्डीत साईभक्त भाविकांना चांदीचा ताटात जेवण साईभक्त तथा उद्योजक दीपकजी निकम यांचा उपक्रम

शिर्डी प्रतिनिधी : 


कोविडच्या प्रकोपात साईसंस्थानच्या रूग्णालयातील डाॅक्टर व कर्मचा-यांसाठी दिल्ली येथील साईभक्तांकडून युध्दपातळीवर खास विमानाने देणगी स्वरूपात पीपीई किट उपलब्ध करून देण्यासाठी येथील निस्सिम साईभक्त तथा उद्योजक दीपक निकम यांनी पुढाकार घेतला. आता ते चालवीत असलेल्या अॅबीगेल रिजन्सी या हाॅटेलात त्यांनी साईभक्तांना चांदिच्या ताटात भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. चांदिचे ताट, चांदिच्या सात वाट्या आणि चांदिचाच ग्लास असा थाट असलेल्या या शाही भोजनासाठी कुठलेही अतिरीक्त शुल्क आकारण्यात आलेले नाही. भाविकांची शिर्डी भेट संस्मरणीय व्हावी याहेतूने साईभक्तीच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड प्रकोपात साईसंस्थानने सूरू केलेल्या रूग्णालयात राज्यभरातून रूग्णांचा ओघ सुरू झाला. पीपीई किट आणि अन्य वैद्यकीय साहित्य मिळवीणे मुश्कील झाले. अशा कठीण काळात निकम व त्यांचे सहकारी यांनी दिल्लीतील साईभक्तां सोबत संपर्क साधला. अवघ्या दोन दिवसात त्यांनी हे साहित्य खास विमानाने शिर्डीला धाडले. केवळ साईसंस्थानच्या रूग्णालयाचीच नव्हे तर तालुक्यातील सरकारी कोविड रूग्णालयाची गरज देखील या साहित्यामुळे पूर्ण झाली.


येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात एकशे चाळीसहून अधिक वृध्द वास्तव्यास आहेत. या आश्रमास वाढीव इमारतीची गरज होती. निकम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. दाते शोधून नवी इमारत उभी करून दिली. साईभक्तीच्या प्रेरणेतून त्यांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात ते सदैव आघाडीवर असतात. साईभक्तांना चांदिच्या ताटात भोजन देण्याचा उपक्रमाबाबत दीपक निकम यांनी सांगितले ते म्हणाले, भाविकांना चांदिच्या ताटात भोजन केल्याचा आनंद आणि समाधान वाटते. त्यांना त्यांची शिर्डी भेट आठवणीत रहावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे.

देश विदेशातील साईभक्त येथे येतात. त्यांच्यादृष्टीने स्वच्छता आणि सौजन्यपूर्ण वागणुक या दोन्ही बाबी फार महत्वाच्या असतात. येथे आल्यानंतर त्यांना कसा अनुभव येतो यावर बरेच काही अवलंबून असते. चांदिच्या ताटात भोजन या उपक्रमा बाबत साईभक्तांच्या प्रतिक्रीया अतिशय उत्साहवर्धक आहेत. दीपक निकम चालवत असलेल्या हॉटेल मधील संपूर्ण स्टाफ साईभक्त् आल्यानंतर भक्तान सोबत सौजन्याने वागत् त्यांचे स्वागत केले जाते

आणी रिसेप्शन जवळ एक मोठी एल ई डी लावून साईभक्तांना दर्शन व्हावे चारही आरत्या व्हाव्यात अशी ऑनलाईन सुविधा केलेली आहे साईभक्त ह्या हॉटेल मध्ये आल्यानंतर अतिशय् भक्तिमय वातावरणाचा अनुभव करीत असतात उद्योजक दीपक निकम हे कायम साईभक्तांच्या हितासाठी सदैव तत्पर असतात त्यातच ते धन्यता मानतात भक्तांची सेवा हीच साईंची सेवा मानतात

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...