लोणी खुर्द येथे दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा – सरपंच जनार्दन घोगरे पाटील
लोणी खुर्द ता. राहाता
भक्तांच्या निष्ठा व ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारलेले व नव्याने जिर्णोद्धार केलेले श्री हनुमान मंदिर आता नव्या तेजाने उजळणार आहे. या पवित्र स्थळी श्री दक्षिणमुखी मारुतीरायांची नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असून, त्यानिमित्ताने भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सोहळ्याचा शुभारंभ मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री मारुती रायांची मूर्तीची भव्य मिरवणूक काढून होणार आहे. बुधवार १३ ऑगस्ट रोजी प्रांत पूजा, मंदिर वास्तू पूजा व धार्मिक विधी पार पडतील. मुख्य प्राणप्रतिष्ठा व स्थापना महोत्सव गुरुवार १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता संपन्न होणार असून, यावेळी रामायणाचार्य, विदर्भरत्न ह.भ.प. रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांचे कीर्तन होणार आहे.
मिरवणुकीत मारुती रायांची मूर्ती,पारंपरिक ढोल-ताशा, भजनी मंडळांचा सहभाग असेल. प्राणप्रतिष्ठा दिनी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
"हा सोहळा संपूर्ण गावासाठी अभिमानाचा, श्रद्धेचा आणि भक्तीमय वातावरणाचा अविस्मरणीय क्षण आहे," असे सरपंच श्री जनार्दन घोगरे पाटील यांनी सांगितले. त्यांनी सर्व लोणी खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक व भाविकांना या दिव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा