लायन्स क्लब राहता व वॉटर पार्क, साई तीर्थ शिर्डी येथे महिला दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिर व आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते डॉक्टर शर्वरी कुलकर्णी यांनी स्त्रियांचे सर्व आजार ,गर्भावस्था, वयात येणाऱ्या मुली, गरोदरपणात घ्यावयाची काळजी, ट्रेस व आहाराबाबत सखोल माहिती , मधुमेह, कॅन्सर बाबत प्रोजेक्टरवर माहिती व आरोग्य विषयक माहिती दिली, आलेल्या महिलांची प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे निराकरण केले
साई तीर्थ व वाटर पार्क येथे आठवडाभरापासून ज्या महिला भगिनी या ठिकाणी भेट देत आहे त्यांना अर्ध्या किमतीमध्ये वॉटर पार्क व साई तीर्थ येथे प्रवेश दिला जात आहे ही विशेष अशी बाब आहे. आज सकाळपासून महिला दिनाचे औचित्य साधून अनुपजी बजाज साहेब जनरल मॅनेजर साईतीर्थ व वॉटर पार्क व सचिनजी डांगे ऑपरेशन हेड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी उपक्रम राबवले जात होते. त्याच ठिकाणी येणाऱ्या महिला व महिला स्टाफ यांच्यासाठी मोफत साखरेची तपासणी, रक्ताची तपासणी ,किडनी, लिव्हर कॅल्शियम तपासणी तसेच कॅन्सर मार्क तपासणी करण्यात आली
दुपारी दोन नंतर या सर्व तपासण्या व मार्गदर्शन झाल्यानंतर खेळ पैठणीचा विशेष कार्यक्रम श्री बजाज साहेबांनी आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ला.अंजली उबाळे ला. सरला तायडे ला. स्मिता मुरादे यांच्या हस्ते पैठणीचे वाटप करण्यात आले
सर्वप्रथम कार्यक्रमाची रूपरेषा व महिला दिनाबद्दल लायन्स क्लब राहता चे डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर संजय उबाळे यांनी मार्गदर्शन केले व जनरल मॅनेजर अनुपजी बजाज साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष लायन्स क्लब राहता इंजिनिअर श्री प्रकाशजी सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ला. रतनजी चौधरी, स्मिता मुरादे ,व साई तीर्थ व वॉटर पार्क येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले
त्यानंतर श्री सचिन डांगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून प्रमुख वक्ते डॉक्टर शर्वरी कुलकर्णी मॅडम व उपस्थित सर्वांचा सत्कार शाल श्रीफळ व साईबाबा ची प्रतिमा देऊन सत्कार करून
उपस्थित सर्वांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा